संपत्तीसाठी पोटच्या मुलांकडून आईचा छळ ; पुण्यात कौटुंबिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार

नईमाबादी कुटुंबीयांनी त्यांच्याच कुटुंबातील ५८ वर्षीय महिलेचा छळ केला आहे. विशेष म्हणजे यात पीडित महिलेच्या मुलांचाही समावेश आहे. संपत्ती मधील आईचा हिस्सा काढून घेण्यासाठी हा छळ करण्यात आला. कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आईने सह्या कराव्यात, फ्लॅट नावावर करून दयावा, अशी पीडितेच्या मुलांची आणि इतर नईमाबादी कुटुंबीयांची मागणी होती.

    कौटुंबिक अत्याचाराचा वेगळा आणि तेव्हढाच धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. पोटच्या मुलांनीच आईचा छळ केला आहे. आईलाच बेदम मारहाण करणाऱ्या या कुपूत्रांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमद अब्बास अली नईमाबादी ( वय ३९ ) आणि हुसेन अब्बास अली नईमाबादी ( वय ३२ ) अशी या दोन मुलांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर, पीडितीचा दीर नादीर अब्दुल हसन नईमाबादी आणि नणंद सलतनत अकबर नईमाबादी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

    पुण्यात एका प्रसिद्ध व्यवसायिक कुटुंबावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. कॅम्प परिसरातील प्रसिद्ध नईमाबादी हे ते कुटुंब आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रिन्स बेकरी आणि गुडलक बेकरीचे नईमाबादी हे मालक आहेत. तसेच त्यांचे स्वारगेट येथे आइडिअल कॅफे हे हॉटेलदेखील आहे.

    नईमाबादी कुटुंबीयांनी त्यांच्याच कुटुंबातील ५८ वर्षीय महिलेचा छळ केला आहे. विशेष म्हणजे यात पीडित महिलेच्या मुलांचाही समावेश आहे. संपत्ती मधील आईचा हिस्सा काढून घेण्यासाठी हा छळ करण्यात आला. कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आईने सह्या कराव्यात, फ्लॅट नावावर करून दयावा, अशी पीडितेच्या मुलांची आणि इतर नईमाबादी कुटुंबीयांची मागणी होती. त्यासाठी पीडित महीला तयार नव्हती, त्यामुळे मुलाने आईला खुर्ची फेकून मारली. तसेच, इतर कुटुंबीयांनी लाथा – बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पीडित महिला गंभीर जखमी झाली. तशाच अवस्थेत जीव वाचवत त्या आपल्या भावाच्या घरी नाना पेठेत पोहचल्या. आमची बहीण आणखी काळ तिथे राहीली असती तर तिचा जिवंत वाचली नसती, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या भावाने व्यक्त केली आहे. पुढे भावाच्या मदतीनेच पीडित महिलेने स्वतःच्या मुलांविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला.

    पिडीत महीला कॅम्प परिसरातील सेनेगॉन्ग स्ट्रीट येथे वास्तव्यास आहेत. तिथेच हा प्रकार घडला. पीडित महिलेचे पती अब्बास अली यांचं २०१९ मध्ये निधन झालं. त्यानंतर, नईमाबादी कुटुंबीयांनी या महिलेचा छळ सुरु केला. दोन वर्ष त्यांनी हा छळ सहन केला. मात्र, जीवघेणी मारहाण झाल्यानंतर त्यांनी भावाचे घर गाठले. त्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.