हातवळण ग्रामपंचायत सरपंचपदी हर्षदा काजेश पवार यांची  बिनविरोध निवड

पारगाव :दौंड तालुक्‍यातील हातवळण ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणुक करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.नऊ सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत व त्यांनी केलेली विकासकामे वाखण्याजोगी आहेत.आज

पारगाव  : दौंड तालुक्‍यातील हातवळण ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणुक करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.नऊ सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत व त्यांनी केलेली विकासकामे वाखण्याजोगी आहेत.आज (ता.२४ जून) रोजी हातवळण ग्रामपंचायत सरपंच पदी हर्षदा काजेश पवार यांची  बिनविरोध निवड करण्यात आली.

हर्षदा पवार या गोपाळ समाजहित महासंघ दौंड तालुका अध्यक्ष काजेश पवार यांच्या पत्नी असून त्यांच्या घरात सामाजिक व राजकीय अनुभव आहे.भविष्यवकाळात सर्वसमावेशक विधायक कामे करण्यात आम्ही जोमाने एकत्र कामे मार्गी लाऊ असे यावेळी बोलताना काजेश पवार यांनी सांगितले.

अनेक गावांतील ग्रामपंचायतीची निवडणूक ही प्रतिष्ठेची असते; मात्र हातवळण मधील गावातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा आदर्श कायम ठेवला आहे. 

निवडणुकीतून घराघरांत अंतर्गत वाद निर्माण होतात. पैशाचादेखील मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. निवडणुकीतील वादविवाद वर्षानुवर्षे राहतात. परिणामी ग्रामस्थांमध्ये सलोखा राहत नाही.

यापूर्वी सरपंच म्हणून आशा म्हेत्रे या काम पाहत होत्या.त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.निवडणूक अधिकारी म्हणून महेश गायकवाड मंडल अधिकारी वरवंड यांनी काम पाहिले.निवडणूक प्रक्रिया कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टिंगचे पालन करत व्यवस्थित पार पडली अशी माहिती ग्रामसेवक सौ.एन. एच शेलार यांनी दिली आहे.

“गावाचा विकास हा उच्च पातळीवर घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे.मला जी संधी दिली आहे तिचे नक्कीच चीज करेल.”

-हर्षदा काजेश पवार ,(नवनियुक्त सरपंच, हातवळण ग्रामपंचायत)