rajesh tope

कोरोनाची लस विकसीत करत असलेल्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या अग्नितांडावात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार इलेक्ट्रिक फॉल्टमुळे आग लागल्याचे त्यांनी सांगीतले.

मुंबई : कोरोनाची लस विकसीत करत असलेल्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या अग्नितांडावात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार इलेक्ट्रिक फॉल्टमुळे आग लागल्याचे त्यांनी सांगीतले.

राजेश टोपे यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन या घटनेचा आढावा घेतला. वेल्डिंगच्या स्पार्कमुळे आग लागली व ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग अधिकच वाढली. घटनास्थळी असलेले ज्वलनशील पदार्थ ही आग भडकण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

सीरम इन्स्टिट्यूटच्या एमएसझेड या मांजरी येथील फॅक्टरीतील एसईझेडी-३ या इमारतीस आग लागली. त्या ठिकाणा रोटा व्हायरस प्लांट इन्स्टॉलेशनचं काम सुरू होतं. ज्यामध्ये वेल्डिंगचं काम सुरू होतं. वेल्डिंगचा एक स्पार्क आगीस कारणीभूत ठरला. ज्वलनशील पदार्थांमुळे आग अधिक भडकली असे आरोग्यमंत्र्यांनी सांगीतले.