निम्मा जून महिना लॉकडाऊनमध्येच जाणार,१५ जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

राज्यात १५ दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) वाढवण्यात येणार आहे. पण, त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope)  यांनी दिली.

    पुणे : राज्यात आणखी सध्याचे टाळेबंदी निर्बंध शिथील होणार नसल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधोरेखित झाल्यानतर येत्या १५ जूनपर्यंत हे निर्बंध कायम राहण्याबाबत आरोग्यमंत्र्यानी(Health Minister) संकेत दिले आहेत. त्याबाबत सर्वांशी चर्चा सुरू आहे. राज्यात १५ दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) वाढवण्यात येणार आहे. पण, त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope)  यांनी दिली.

    १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो
    आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांची संवाद साधताना पुन्हा एकदा राज्यातील पॉझिटिव्ही रेट १० %पेक्षा जास्त असेल तर गो स्लो गेले पाहिजे. त्यासाठी १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो त्यामुळे निर्बंधाची मर्यादा वाढवण्याचा विचार सुरू आहेअसे टोपे म्हणाले. राज्यात गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहतील. ज्या जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले तिथे काही प्रमाणात शिथिलता देता येईल का याबाबत चाचपणी सुरू आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

    निधी एक रकमी देण्यास राज्याची तयारी
    लसीकरणाबाबत असलेल्या तांत्रिक अडचणींचा त्यांनी पुन्हा पाढा वाचला. केंद्र सरकारची भुमिका यात महत्वाची असल्याने त्याबाबत केंद्राला विनंती करत आहोत असे ते म्हणाले. या साठी आवश्यक निधी एक रकमी देण्यास राज्याची तयारी आहेअसे ते म्हणाले. येत्या काळात लहान मुलांचा धोका ओळखून त्याबाबत पेड्रीयाटिक टास्क फोर्स गठीत झाला आहे असे ते म्हणाले.