आरोग्यदायी वातावरणातील सुदृढ नागरिक म्हणजे सुदृढ अर्थव्यवस्था : महेश रामानुजम

जागतिक कोविड-१९ (Covid-19)संकटामुळे लागू कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमधून जग आता हळुहळू काही प्रमाणात का होईना पूर्ववत होत आहे. आता नवी परिस्थिती स्वीकारण्याची वेळ आहे. हे नवे जग कदाचित आपण आधी जगत होतो त्या जगाहून वेगळे असेल. या संकटाचे परिणाम पुढील काही वर्षे दिसणार आहेत – अर्थव्यवस्थेवर, लोकांवर आणि आपल्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीवर. बहुतांश जगाने गेले काही महिने घरातच बसून घालवले. या काळात आपल्या इमारतींचे आरोग्य आपल्या आरोग्यावर कसा परिणाम करते, याचा कधी नव्हे इतका विचार आपण केला. मात्र, जग पूर्ववत होत असताना आपण ही प्रक्रिया सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासाने करून यासाठी स्वत:ला योग्य साधनांनी सज्ज करणं अत्यंत महत्त्वाचं आहे असे मत यूएसजीबीसी आणि जीबीसीआयचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश रामानुजम यांनी व्यक्त केले आहे. तसेच यूएसजीबीसीच्या साह्याने या संकट काळात यशस्वी मार्गक्रमण शक्य असल्याचा विश्वास त्यांनी दर्शविला.

जगातील अर्धी लोकसंख्या सध्या दारिद्र्य रेषेखाली जगत आहे. इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाच्या अंदाजानुसार २०२०-२०२१ पासून या जागतिक महासंकटामुळे एकत्रित जागतिक जीडीपी घट सुमारे ९ ट्रिलियन डॉलर इतकी, म्हणजे जपान आणि जर्मनीच्या एकत्रित अर्थव्यवस्थेहून अधिक असेल. याचाच अर्थ, या आरोग्य संकटातून बाहेर पडत असताना आपल्या अर्थव्यवस्था, आपल्यापैकी अधिक संवेदनशील अर्थव्यवस्थांवर यापुढेही परिणाम होत राहील. या संकटाचे परिणाम दीर्घकालीन आहेत आणि यातून बाहेर पडण्यासाठी आपल्यामध्ये लवचिकता आणि सर्जनशीलता या दोन्ही बाबी आवश्यक असतील असेही ते पुढे म्हणाले.

नव्या पर्वात यशस्वी प्रवेश करण्यासाठी आपण लोकांमध्ये हा विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत की त्यांची घरे आणि इमारती फक्त त्यांच्यासाठीच नव्हे तर एकूण अर्थव्यवस्थेवसाठीही आरोग्यदायी असायला हवीत. त्यासाठी आवश्यक आहे या क्षेत्राशी, या जागांशी संबंधित टीमचे प्रयत्न. फक्त सध्याचे संकट पाहून त्यावर दिलेला प्रतिसाद या स्वरुपात नाही, तर आपल्याला आजवर ज्ञात जगाहून एक वेगळे भविष्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.अपार्टमेंट बिल्डिंग्स आणि कार्यालयांसारख्या मोठ्या संकुलांमधील लोकांमध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रमाणन किंवा सर्टिफिकेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. विश्वासार्ह आणि सत्यापित स्रोतांनी आखून दिलेले मापदंड गाठत संबंधित संकुलांमध्ये तेथील लोकांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य दिले जाते, हे जाहीर करता येईल. या पायऱ्या गाठण्यासाठी आवश्यक भाषा आणि डेटा या दोन्ही बाबी सर्टिफिकेशनमुळे उपलब्ध होतात आणि सध्याच्या गरजाही चटकन पूर्ण होतात. विशेषत: ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशनमुळे बिल्डर्स आणि विकासकांना त्यांच्या इमारतींमध्ये सुरक्षा सुविधांचा समावेश करणे, कोविडपश्चात जगासाठीची सज्जता, पुनरुज्जीवनासाठी आवश्यक महत्त्वाचा दर्जा गाठणे आणि अंतिमत: जागतिक आर्थिक संकटातून वाचण्याच्या प्रयत्नांना हातभार लावणे यात साह्य लाभणार आहे. आपल्या जागांमध्ये येणाऱ्यांना या जागांच्या आरोग्याची माहिती देण्याचा उत्तम मार्ग म्हणून ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन मिळवण्याचे प्रयत्न येत्या काही वर्षांत वाढतील, असा आमचा अंदाज आहे. तसेच, हा दर्जा मिळवण्यासाठी, तो टिकवण्यासाठी कंपन्याना आधीच्या तुलनेत अधिक सक्रिय रहावे लागणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

‘न्यू नॉर्मल’साठी  यूएसजीबीसी सज्ज

यूएसजीबीसीमध्ये आमचा विश्वास आहे की, सार्वजनिक आरोग्य आणि भरभराटीला आलेली अर्थव्यवस्था एकमेकांना अनुरूप असतात. पण त्याचबरोबर या दोन बाबी हातात हात घालून पुढे जात असतात. कोविड-१९च्या संकटाला प्रतिसाद देताना आम्ही दीर्घकालीन उद्दिष्टांचा विचार करत आहोत. आरोग्यदायी जागांमधील सुदृढ नागरिक म्हणजे सुदृढ अर्थव्यवस्था उभारण्याचा सर्वात वेगवान मार्ग. विविध पातळ्यांवर या प्रक्रियेस साह्य करणाऱ्या विविध कर्ज योजना, उपक्रम आणि साधनांचा यात समावेश होतो. या धोरणांमध्ये नव्या एलईईडी सेफ्टी फर्स्ट पायलट क्रेडिट्सचा समावेश आहे. आघाडीच्या सार्वजनिक आरोग्य आणि औद्योगिक मार्गदर्शक तत्वांनुसार यात शाश्वत सुयोग्य पद्धती नमूद करण्यात आल्या आहेत. तसेच आर्क री-एण्ट्रीमध्ये संसर्गनियंत्रण योजना आणि पद्धतींचे मापदंड, रहिवाशांचा अनुभव गोळा करणे आणि कार्यालयांमधील हवेच्या दर्जाची माहिती मिळवणे यासाठीच्या साधनांचा समावेश आहे. याचा वापर एकमेव स्रोत म्हणून किंवा एलईईडी पायलट क्रेडिट्सला सहाय्यक म्हणूनही करता येईल.

आपली घरे पूर्वीच्या तुलनेत अधिक महत्त्वाची ठरत आहेत आणि जग पूर्ववत होत असताना इतर ठिकाणांवरही आपण तितकेच लक्ष देत आहोत. आपल्या घरांमध्ये आपण ज्या प्रकारे काळजी घेतो त्याच पद्धतीने मोठ्या जागांसाठीही आपण अधिक प्रमाणात प्रयत्न करायला हवेत. सर्टिफिकेशन आणि योग्य प्रयत्नांच्या साह्याने आपण आपल्या ‘न्यू नॉर्मल’साठी प्रयत्न करू शकू… असे नवे जग जे सुरक्षित असेल, आरोग्यदायी असेल आणि जिथे भरभराट होईल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .