Hearing in the High Court; 450 cases filed against DSK family members and their various companies

बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या सर्व दाव्यांची सुनावणी एकाच न्यायालयात चालविण्याच्या याचिकेवर हायकोर्ट निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जदारांनी आधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

    पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या सर्व दाव्यांची सुनावणी एकाच न्यायालयात चालविण्याच्या याचिकेवर हायकोर्ट निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जदारांनी आधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

    न्यायाधीश रोहिंटन फली नरिमन आणि न्यायाधीश बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. डीएसके यांच्यावर दाखल असलेल्या सर्व दाव्यांची सुनावणी मुंबई किंवा पुण्यातील विशेष न्यायालयात घेण्यात यावी. याचिकेवर निकाल होत नाही तोपर्यंत जामीनावर सुटका करावी, अशी मागणी करणारी याचिका डीएसके यांचे वकील प्रतीक राजोपाध्ये आणि ॲड. आशिष पाटणकर यांनी दाखल केली होती.

    डीएसके, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या विविध कंपन्यांवर ठेवीदारांची फसवणूक व इतर विविध कलमांनुसार देशात सुमारे 450 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.