ह्रदयद्रावक घटना! मधुमक्षिकेच्या हल्ल्यानंतर पित्याचा मृत्यू ; पितृवियोगाने मुलाचा मृत्यू 

बाबुराव दरेकर हे आपला मुलगा सुन व नातवंडे यांच्यासोबत आपल्या शेतामध्ये गेले होते. परंतु शेतात गेल्यावर गाडीतुन उतरताच पुर्ण कुटुंबावर मधमाश्यांनी हल्ला चढवला या हल्ल्यात पुर्ण दरेकर कुटुंब जखमी झाले. बाबुराव दरेकर यांच्यावर या माश्यांनी खुप मोठ्या प्रमाणावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच त्याची प्रणज्योत मालवली.

    माळशिरस: पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणाऱ्या आंबळे येथे वडिलांचा मधुमक्षिकेच्या हल्ल्यानंतर मृत्यू झाल्याची माहीती समजताच मुलानेही एक ते दीड तासात प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना आंबळे येथे रविवारी सायंकाळी घडली. वडिल बाबुराव सर्जेराव दरेकर(वय ७३) व मुलगा सचिन बाबुराव दरेकर (वय ३६)अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ही घटना समजताच परिसरात शोककळा पसरली होती. बाबुराव दरेकर हे आपला मुलगा सुन व नातवंडे यांच्यासोबत आपल्या शेतामध्ये गेले होते. परंतु शेतात गेल्यावर गाडीतुन उतरताच पुर्ण कुटुंबावर मधमाश्यांनी हल्ला चढवला या हल्ल्यात पुर्ण दरेकर कुटुंब जखमी झाले. बाबुराव दरेकर यांच्यावर या माश्यांनी खुप मोठ्या प्रमाणावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच त्याची प्रणज्योत मालवली. वडिलांचा मृत्यु झाला आहे, असे कळल्यानंतर त्यांचा मुलगा सचिन दरेकर यांना हा धक्का सहन झाला नाही व अवघ्या एक ते दीड तासात त्यांना ह्रदयविकाराचा तिव्र धक्का झाला. या धक्क्यात त्याचाही मृत्यू झाला. या ह्रदय द्रावक घटनेमुळे पुर्ण आंबळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.