पुण्यात धुव्वादार पाऊस ; ऑक्टोबर हिटमध्ये पुणेकरांना धु धु धुतले

गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटचा अनुभव घेणाऱ्या पुणेकरांना पावसाने आज दुपारी धु धु धुतले. सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांना गारवा जाणवला. गारेगार वातावरण निर्माण झाल्याने पुणेकरांनी पावसाचा आनंद लुटत उफाळलेला चहा, कुरकुरीत भजी, गरमागरम वडापावचा आस्वाद घेतला.

पुणे. गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटचा अनुभव घेणाऱ्या पुणेकरांना पावसाने आज दुपारी धु धु धुतले (heavy rainfall in pune). सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांना गारवा जाणवला. गारेगार वातावरण निर्माण झाल्याने पुणेकरांनी पावसाचा आनंद लुटत उफाळलेला चहा, कुरकुरीत भजी, गरमागरम वडापावचा आस्वाद घेतला.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात, धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. सदाशिव पेठ, नारायण पेठ, दांडेकर पूल, कर्वेनगर, वारजे, कोथरूड, शिवणे, उत्तमनगर, येरवडा, परिसरात तुफान पाऊस झाला. नाला, नदीतून प्रचंड पाणी वाहत होते. सायंकाळी पावसाने विश्रांती घेतल्यावर पुणेकरांनी बाहेर पडण्यास पसंती दिली. या पावसामुळे दुचाकी धारकांचे मात्र हाल झाले. रस्ते निसरडे झाल्याने काही ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या.
यावर्षी पावसाने पुणेकरांवर कृपा करून चारही धरणांत १०० टक्के पाणीसाठा निर्माण केला आहे. त्यामुळे २ वेळच्या पाण्याची चिंता मिटली आहे.