ग्रामीण भागात अतिवृष्टिमुळे जनजीवन विस्कळीत

पारगाव  : नानगांव ता.दौंड येथे अतिवृष्टिमुळे स्मशान भूमिकडे जाणारा नाला पूल भूस्खलित झाला आहे.अंतविधि, दशक्रिया विधी असे विधी साठी जताना लोकांची तारंबळ उडाली होती.नदी काठाच्या तिरावर असलेल्या शेतकरी वर्गाची विज पंप बाहेर काढण्यासाठी धाव पळ उडाली होती.

पारगाव  : नानगांव ता.दौंड येथे अतिवृष्टिमुळे स्मशान भूमिकडे जाणारा नाला पूल भूस्खलित झाला आहे.अंतविधि, दशक्रिया विधी असे विधी साठी जताना लोकांची तारंबळ उडाली होती.नदी काठाच्या तिरावर असलेल्या शेतकरी वर्गाची विज पंप बाहेर काढण्यासाठी धाव पळ उडाली होती.यावेळी रात्री झालेल्या अतिवृष्टि मुळे अनेकांचे विज पंप या आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे.नानगांव व केडगांव ला जोडनारा हाडूळीचा ओढा पाण्याने भरून वाहत असल्याकारणाने नागरिकांची पंचाईत झाली.

संपूर्ण पुणे जिल्हा आणि परिसरामध्ये होत असलेल्या अतिवृष्टिमुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, नागरीकांच्या घरांचे, मालमत्ता व शेतीचे देखिल मोठे नुक़सान झाले आहे.परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हवामान खात्याद्वारे पुढील काही दिवस अतिवृष्टिची शक्यता वर्तवण्यात आली आहे व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अतिवृष्टीमुळे घराची पडझड, जनावर हानी, मनुष्यहानी, शेतीची हानी झाली, शेतीपंप वाहून गेले आदी संदर्भात नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

दौंड तालुक्यातील केडगांव,पारगाव व इतर गावाचे रस्ते पाण्याखाली वाहून गेले आहे त्यामुळे काही तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.हवामान खात्याने यापूर्वी सूचना केल्या आहेत की,कुणीही अति महत्वाच्या कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये येत्या काही दिवसात अतिवृष्टिचा इशारा दिला आहे याची खबरदारी सर्वानी घ्यावी.