कवठे येमाई परिसरात अर्धातास दमदार पाऊस -शेती कामांना वेग येणार

कवठे येमाई : शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील कवठे येमाई व परिसरात आज दुपारी एक ते दीड च्या दरम्यान हंगामातील पहिला व जोरदार पाऊस बरसला.

 कवठे येमाई : शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील कवठे येमाई व परिसरात आज दुपारी एक ते दीड च्या दरम्यान हंगामातील पहिला व जोरदार पाऊस बरसला. यामुळे शेती कामांना आता वेग येणार असून खरीपातील पिकांच्या मशागती व पेरण्या सूरु होतील असा विश्वास शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. 

       अतिशय शांत वातावरण,विजांचा कडकडाट नाही,वादळ, वारा नाही अशा स्थितीत कवठे येमाई परिसरात आभाळात दाटून आलेल्या नभांतून अर्धा तास जोरदार जलधारा बरसल्या. पहिल्याच पावसात शेतातून,रस्त्यांच्या कडेने व गावठाणातून पावसाचे पाणी वाहात असलेले पाहावयास मिळाले. तर बच्चे कंपनी या पहिल्या पावसात यथेच्छ भिजण्याचा आनंद घेताना दिसले. या पहिल्याच व जोरदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.