वादळी पावसाने पुण्याला झोडपले

पुणे : जोरदार वाऱ्यासह शहरात पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडली. सोमवार पेठेत मोबाईल टौवर आणि शिवाजीनगर येथे लोखंडी कमान कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. सलग

 पुणे : जोरदार वाऱ्यासह शहरात पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडली. सोमवार पेठेत मोबाईल टौवर आणि शिवाजीनगर येथे लोखंडी कमान कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. 

सलग दुसऱ्या दिवशी पावसाने शहरात हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी चारनंतर ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर जोरदार वार्यासह अवकाळी पावसाने शहर धुवून काढले. जोरदार वार्यामुळे शिवाजीनगर येथील संचेती रुग्णालयाजवळ असलेली वाहतूक दिशादर्शक कमान कोसळली. नेहमी वर्दळीच्या या रस्त्यावर संचार बंदी मुळे वाहने नव्हती. अन्यथा मोठी जिवीत हानी झाली असती. सोमवार पेठेत एका इमारती वर असलेला मोबाईल टौवर कोसळला. येथे जवळ एक झाड पडुन काही लोक अडकून पडले आहे. अग्निशमन दलाचे जवान त्यांची सुटका करीत आहे अशी माहिती दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली. 

शहरात वार्यामुळे झाडपडीच्या साठहुन अधिक घटना घडल्याची माहिती दलाकडे आली असुन, दलाचे १४ बंब आणि सहा देवदुत वाहने आणि जवान मदत कार्यात गुंतले आहे. कस्तुरे चौक येथील विठ्ठल मंदिराच्या आवारातील झाड कोसळुन सीमाभिंत जमीनदोस्त झाली आहे. यामुळे महाराणा प्रताप रस्त्यावरील वाहतूक थांबली आहे.