भेदभाव न करता मदत करा, मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घ्या : एकनाथ शिंदे

केंद्राने भेदभाव न करता राज्याला भरीव मदत केली पाहिजे. केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपंजी आहे. भेदभाव न करता केंद्र सरकारने मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे, असं शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

    पुणे : केंद्राने भेदभाव न करता राज्याला भरीव मदत केली पाहिजे. केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपंजी आहे. भेदभाव न करता केंद्र सरकारने मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे, असं शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

    नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

    ठाकरे सरकारने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यात येत आहे. पंचनामे झाल्यावर येत्या दोन दिवसात पॅकेज जाहीर केलं जाईल. पॅकेज जाहीर करणं अत्यंत आवश्यक आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे सुरू करण्यात आली आहेत. कोकणात पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची भिती आहे. त्यामुळे आम्ही कॅम्प राबवतोय, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

    दरम्यान, ठाण्यातील धर्मवीर दिघे मोफत फिरता दवाखाना शिरोळ तालुक्यातील नरसोबाची वाडी, जैनापूर येथे दाखल झाली असून शिबीरांना सुरूवात झाली आहे.