adar poonawala

ॲस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन सिरम करीत आहेत. अनेक देश कोरोना लसीसाठी सिरमवर अवलंबून आहेत. परंतु, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी सिरमला लसीची निर्यात थांबवावी लागणार आहे. याचा फटका अनेक देशांतील कोरोना लसीकरणाला बसणार आहे. या लसीच्या निर्यातीसंदर्भात अनेक देशांशी करार झाले आहेत. आता अनेक देशांना ही लस मिळण्यास विलंब होत असल्याने ॲस्ट्राझेनेकाने सिरमला कायदेशीर नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.

    पुणे :  देशात कोरोना रूग्णांची संख्य़ा वाढत आहे. अशा परस्थितीमध्ये कोरोना लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आधी भारतीयांना ही लस देण्याची भूमिका घेतली आहे. भारतातील परिस्थितीचा विचार करुन दोन महिन्यानंतर पुन्हा निर्यातीचा विचार करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे जगातील अनेक देशांना लस मिळण्यास विलंब होत आहे. यावरुन ॲस्ट्राझेनेका कंपनीने सिरमला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

    लस मिळण्यास विलंब

    ॲस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन सिरम करीत आहेत. अनेक देश कोरोना लसीसाठी सिरमवर अवलंबून आहेत. परंतु, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी सिरमला लसीची निर्यात थांबवावी लागणार आहे. याचा फटका अनेक देशांतील कोरोना लसीकरणाला बसणार आहे. या लसीच्या निर्यातीसंदर्भात अनेक देशांशी करार झाले आहेत. आता अनेक देशांना ही लस मिळण्यास विलंब होत असल्याने ॲस्ट्राझेनेकाने सिरमला कायदेशीर नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.

    करारांममुळे बंधने

    परस्पर सामंजस्याने मार्ग काढण्याचे सर्व प्रयत्न आम्ही करीत आहोत. सिरमकडून प्राधान्याने भारतातील मागणीचा विचार होत आहे. यामुळे इतर देशांना लस मिळण्यास विलंह होत असून, आधी करण्यात आलेल्या करारांमुळे कायदेशीर बंधने येत आहेत. या प्रकरणी प्रत्येक जण सामंजस्याची भूमिका घेत असून, सरकारही यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी सांगीतले.