उच्चशिक्षीत सुनेचा छळ, ८ जणांविरूध्द गुन्हा

पीडित विवाहिता यांचा २०१७ साली गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड यांच्याशी पीडित विवाहितेचे लग्न झाले होते. २०१७ पासून दागिने आणि हुंडयाच्या कारणावरून पीडितेला सतत त्रास देण्यात येत होता. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्हयाबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही,अशी माहिती पोलिसांनी दिली. गुन्ह्याचा अधिक तपास चतुःश्रृंगी पोलिस पी.एस.आय.पंदरकर करत आहेत.

    पुणे : औंध येथील उच्चशिक्षीत सुनेचा शारीरिक, मानसिक आणि अमानुष छळ केल्याप्रकरणी पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात उद्योजक व कुटुंबातील तिघांसह ८ जणांविरूध्द आणि हुंडा प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ वर्षीय पीडित विवाहितेने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय ३६) नानासाहेब शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड तिघे रा.औंध, पुणे व सोनाली दिपक गवारे, दिपक निवृत्ती गवारे (दोघे रा. जेएम रोड, पुणे) दिपाली विरेंद्र पवार (रा. औंध, पुणे) भागीरथी पाटील (रा. औंध, पुणे , राजु अंकुश (सध्या रा. सांगवी, पुणे. मुळ रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

    पोलिस ठाण्यातील दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, पीडित विवाहिता यांचा २०१७ साली गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड यांच्याशी पीडित विवाहितेचे लग्न झाले होते. २०१७ पासून दागिने आणि हुंडयाच्या कारणावरून पीडितेला सतत त्रास देण्यात येत होता. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्हयाबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही,अशी माहिती पोलिसांनी दिली. गुन्ह्याचा अधिक तपास चतुःश्रृंगी पोलिस पी.एस.आय.पंदरकर करत आहेत.