कंटेनरला धडकवून दुचाकीस्वार ठार ; पोलिस तपास करत आहेत.

विनोदकुमार जोगेश्वर प्रसाद (वय ४२, रा. झारखंड) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रसाद यांनी  एअर लिक्विड कंपनीसमोर वासुली ते एचपी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कंटेनर उभा केला होता.

    पिंपरी: रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
    शुभम राजू राशिनकर (वय १९, रा. झित्राईमळा, चाकण) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. राजू धोंडीराम राशिनकर (वय ४३) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    विनोदकुमार जोगेश्वर प्रसाद (वय ४२, रा. झारखंड) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रसाद यांनी  एअर लिक्विड कंपनीसमोर वासुली ते एचपी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कंटेनर उभा केला होता. त्यावेळी शुभम हा दुचाकीवरून जात असताना त्याच्या दुचाकीची धडक कंटेनरला बसली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने शुभमचा मृत्यू झाला. रस्त्यावर निष्काळजीपणे लोकांच्या जीवीतास धोका निर्माण होईल, अशा प्रकारे कंटेनर उभा केल्याने आरोपी प्रसाद याला अटक करण्यात आली आहे. चाकण पोलिस तपास करत आहेत.