‘कृषी कायद्यांची होळी’ ; किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना समितीसह विविध पक्ष संघटना आंदोलनात सामील

कृषी कायदे रद्द  करावेत म्हणून शेतकर्‍यांची ठाम भूमिका आहे, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आजचे हे आंदोलन आहे. तरी लवकरात लवकर हे कायदे रद्द झालेच पाहिजे असे प्रतिपादन मानव कांबळे यांनी केले.

पिंपरी: अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांची आंबेडकर चौक पिंपरी येथे होळी केली. गेली ४९ दिवसांपासून दिल्लीत सुरु असणार्‍या काळ्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. १२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने समिती गठन केली असून सदर समितीच ही ह्या कायद्याला समर्थन करणारी टोळी असून यांच्याकडून शेतकर्‍यांना अपेक्षा नाही.

कृषी कायदे रद्द  करावेत म्हणून शेतकर्‍यांची ठाम भूमिका आहे, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आजचे हे आंदोलन आहे. तरी लवकरात लवकर हे कायदे रद्द झालेच पाहिजे असे प्रतिपादन मानव कांबळे यांनी केले.” माकप, इंदिरा काँग्रेस, बारा बलुतेदार महासंघ, नागरी हक्क सुरक्षा समिती, डी वाय एफ आय, महासंघ, ओबीसी संघर्ष समिती, फेरीवाला क्रांती महासंघ, प्रहार जनशक्ती संघटना, स्वराज अभियान सह अनेक संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला

माजी नगरसेवक मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, अनिल रोहम,गणेश दराडे, सलीम सय्यद, काशीनाथ नखाते, इब्राहिम खान, भाई विशाल जाधव, संजय गायके, संदेश नवले, अजीज शेख, शिवराम ठोंबरे, मनोज गजभार, आनंदा कुदळे, काळूराम गायकवाड, गौतम गजभार, प्रदीप पवार ईत्यादी कार्यकर्ते या आंदोलनात सामील होते.