गृहमंत्र्यांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक

चिराग सातव पाटील यांनी पोलिसांप्रती दर्शवली कृतज्ञता वाघोली : (ता. हवेली) मागील अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट राज्यातील पोलीस बांधव

चिराग सातव पाटील यांनी पोलिसांप्रती दर्शवली कृतज्ञता

वाघोली : (ता. हवेली) मागील अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट राज्यातील पोलीस बांधव अहोरात्र प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असताना दिसून येत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवार (दि.८) रोजी पुणे येथे कोरोना नियंत्रणासाठी पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत माहिती घेतली. दरम्यान गृहमंत्री यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी वाघोली गावाचे युवा नेते चिराग राजेंद्र सातव पाटील यांनी कोविड १९ च्या लढ्यात पोलीस बांधवांनी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणारे सर्व पोलीस बांधव देवदूत असल्याची भावना व्यक्त करत गृहमंत्री अनिल देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन पोलिसांप्रती कृतज्ञता दर्शवली.  

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी पुणे येथे भेट देऊन पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने कोरोना संसर्गजन्य नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच संवाद साधून अडीअडचणी जाणून घेत काही सूचनाही केल्या. दरम्यान गृहमंत्री देशमुख यांनी येरवडा येथील कोरोना तपासणी केंद्रास भेट देऊन येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष संवाद साधला.

पोलीस शिपाई गोविंद कोळेकर, तेजस कुंभार, महिला पोलीस निशा शिंदे यांची गृहमंत्री यांनी आवर्जून विचारपूस केली. मास्क, सॅनीटायजरचा वापर करा आवश्यक असल्यास तात्काळ तपासणी करून स्वतःची काळजी घ्या असे सांगितले.