संजय राठोडांच्या क्लीन चिटवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

संजय राठोड यांच्या प्रकरणात पोलिसांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाहीये त्यामुळे क्लीन चिट देण्याचा प्रश्नच नाही. पुणे पोलीस तपास करत आहेत, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्यात ते माध्यमांंशी बोलत होते.

    पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले शिवसेनेचे नेते आणि तत्कालिन मंत्री संजय राठोड यांना क्लीन चीट देण्यात आल्याचं बोललं जात आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राठोड यांच्या प्रकरणात पोलिसांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाहीये त्यामुळे क्लीन चिट देण्याचा प्रश्नच नाही. पुणे पोलीस तपास करत आहेत, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्यात ते माध्यमांंशी बोलत होते.

    दरम्यान पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पोलिसात जबाब दिला आहे. त्यामध्ये पूजाच्या आत्महत्येचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी जबाबात म्हटलं आहे. तसेच पूजाच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर घडलेला सर्व प्रकार हा राजकीय नाट्य असल्याचंही त्यांनी जबाबात म्हटलं आहे.

    चित्रा वाघ काय म्हणाल्या?

    तसेचं शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना क्लीनचिट देण्यात आलेली नसून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आम्ही पोलिसांकडे मागणी केली आहे. याबाबत आम्ही पुणे पोलिस आयुक्त तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. असं चित्रा वाघ म्हणाल्या.