कवठे येमाईत मुंबई, पुण्यातून आलेल्या ८ जणांना केले होम क्वारंटाईन

कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असताना रात्री येडेबोर्हाडे वस्तीत मुंबई येथून ६ तर पोळ वस्तीत भोसरी येथून एक महिलाव मुंजालवाडीत १ महिला पुण्यातून दाखल

कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असताना रात्री येडेबोर्हाडे वस्तीत मुंबई येथून ६ तर पोळ वस्तीत भोसरी येथून एक महिलाव मुंजालवाडीत १ महिला पुण्यातून दाखल झाल्याने या सर्वांना आरोग्य तपासणी करून होम कवारंटाईन करण्यात आल्याची माहिती कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश कट्टीमनी यांनी दिली.तर मागील ३ दिवसात एकूण ११ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

बाहेरून गावात येत असलेल्या नागरिकांची तात्काळ माहिती स्थानिक प्रशासनास देण्याची गरज असून नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या गावात वस्तीत मुंबई,पुणे परिसरातून येणाऱ्या व्यक्तींची माहिती तातडीने द्यावी असे आवाहन शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,सरपंच अरुण मुंजाळ यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात शिक्षक,आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन सर्व्हे सुरु केला असून दोन दिवसांत ११४५ घरांना भेटी देत ६१५२ लोकांचा सर्वे करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

कवठे येमाई सारख्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्थानिक तरुण नितीन मुखेकर,दादू काळे,गणेश काळे,जगन्नाथ सांडभोर,अनिल रायकर, कमलेश,कल्पेश बोरा बंधू,विजय गांधी,जगन्नाथ सांडभोर,माटे बंधू ,राजेश सांडभोर व इतर तरुण कोरोना योद्धा म्हणून मागील ५ दिवसांपासून रात्रंदिवस जागत प्रशासनास सहकार्य करीत आहेत.गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्यानंतर गावातील मेडिकल वगळता सर्वच व्यवसाय बंद ठेवण्यात आले असून अजून ही काही जण विनाकारण गावात फिरताना दिसून येत आहेत. नागरिकांनी घरातच थांबावे, विनाकारण फिरू नये, हात वारंवार साबणाने स्वच्छ ठेवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन शिरूरचे गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील यांनी केले आहे. 

शिरूर-मंचर रस्त्यावर मुंजाळवाडी व इचकेवाडी येथे २ तपासणी नाके उभारण्यात आले असून या ठिकाणी पोलीस तैनात करण्याची मागणी सरपंच अरुण मुंजाळ यांनी केली आहे. तर त्या ठिकाणी स्थानिक तरुण पोलिसांच्या मदतीला असतील असे मुंजाळ यांनी सांगितले.