राष्ट्रवादीच्या आमदारावर हनीट्रॅपचा प्रयोग; पक्षातीलच बड्या पदाधिकाऱ्याने रचला होता डाव

खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडवकण्याचे षडयंत्र उघडकीस आले. विशेष म्हणजे एका तरुणीने या प्रकरणाचा भांडाफोड केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हनी ट्रॅपसाठी आमदारांच्या जवळचा असणाऱ्या त्यांच्याच भावकीतील शैलेश पाटील यांचा हात असल्याचे समोर आले आहे. शैलेश हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राष्ट्रीय सरचिटणीस असल्याने खळबळ उडाली आहे.

    पुणे : खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडवकण्याचे षडयंत्र उघडकीस आले. विशेष म्हणजे एका तरुणीने या प्रकरणाचा भांडाफोड केला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हनी ट्रॅपसाठी आमदारांच्या जवळचा असणाऱ्या त्यांच्याच भावकीतील शैलेश पाटील यांचा हात असल्याचे समोर आले आहे. शैलेश हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राष्ट्रीय सरचिटणीस असल्याने खळबळ उडाली आहे.

    तरुणीने केला प्रकरणाचा भंडाफोड

    एका युवतीच्या मदतीने आमदार पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याची योजना आखली होती. बदनामीची भीती घालत त्यांच्याकडून लाखो रुपये गोळा करण्याचा त्यांचा डाव होता. त्या बदल्यात यायुवतीला काही रक्कम या प्रकरणातील संशयित आरोपींनी दिली होती. मात्र, त्या युवतीनेच संशयितांचा भांडाफोड करून हे प्रकरण उघडकीस आणले. साताऱ्यातील त्या युवतीने मयुर मोहिते यांना फोन करून या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने सातारा पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता, हा सगळा प्रकार समोर आला.

    नोकरीच्या बहाण्याने साधला संपर्क

    त्या युवतीने चौकशीत दिलेली माहिती अशी की, साताऱ्यात राहणारा सोमनाथ शेडगे हा तिचा मित्र असून त्याच्या ओळखीने शैलेश मोहिते आणि राहुल कांडगे हे दोघेजण 12 एप्रिलला तिला भेटण्यासाठी साताऱ्यात आले होते. त्यांनी तिला आमदार पाटील यांची बदनामी करायची असून त्यासाठी तुझी मदत पाहिजे असल्याचे सांगितले. असे कृत्य करण्याच्या बदल्यात तिला काही रोख रक्कम आणि पुण्यात एक फ्लॅट देण्याचे कबुल केले. त्यासाठी तिला नोकरीच्या बहाण्याने आमदारांकडे जाण्यास सांगितले आणि त्यानंतर त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांची बदनामी करण्याची योजना होती. या बदल्यात तिला एकूण 90 हजार रूपये देण्यात आले.