स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा गौरव

पिंपरी : कोरोनाच्या काळात स्मशानभूमीत काम करणा-या कर्मचाऱ्यांचा स्टुडण्ट्स एज्युकेशन सोसायटी व उपमहापौर केशव घोळवे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी निगडी स्मशानभूमीतील कर्मचारी बाबासाहेब भोर, भंडारी व पवार यांचा कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना उपमहापौर केशव घोळवे म्हणाले, रस्ते, उड्डाण पूल, मॉल उभारली म्हणजे शहर स्मार्ट होत नाही. शहरातील वंचित, शोषक यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, असे मत घोळवे यांनी व्यक्त केले.या वेळी स्टुडण्ट्स एज्युकेशन सोसायटीच्या उपाअध्यक्षा चेतना सोनवले, सदस्या रुपाली पवार, ज्येष्ठ उद्योजक मुकेश मेहता, उद्योजक अभिषेक खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्टुडण्ट्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय सोनावले म्हणाले, आमची संस्था सामाजिक कामात कार्यरत असते. पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक आपत्ती, शिक्षण या क्षेत्रात काम करण्यास कटिबद्ध असते. याप्रसंगी बाबासाहेब भोर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.