जागतिक महिला दिनानिमित्त ‘ती’ चा सन्मान ; ‘स्त्रीशक्ती सन्मान’ पुरस्काराचे वितरण

    पुणे : कोथरूड, कर्वेनगर भागातील विविध क्षेत्रातील महिलांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी तानाजीराव शितोळे सामाजिक ट्रस्टच्या वतीने ‘स्त्रीशक्ती सन्मान’ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शितोळे यांनी या पुरस्काराचे आयोजन केले होते.

    कार्यक्रमासाठी राष्ट्रीय युवा पुरस्कार सन्मानित दिक्षा दिंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहोळ, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, वृषाली चौधरी, डॉ.सुभदा कामत, डॉ.वैभवी देशमुख, डॉ.संगीता गावडे, डॉ.मोहोळ मॅडम, शिवछत्रपी पुरस्कार सन्मानित सुप्रिया जोशी-भांबुरे, शिवानी गरूड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पायल पंचभाई, दिपाली जाधव, पुणे शहर पोलीस अंकिता निधाळकर, वारजे पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मराठे, आदर्श शिक्षिका शकुंता शितोळे, सपना शिंगणे, संगीता वाबळे, भोर , मंगल क्षीरसागर, डोंगरे , रत्ना तसेच साफसफाई कर्मचारी यांना स्त्रीशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

    यावेळी दीक्षा दिंडे या महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, महिलांनी त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक राहणे आवश्यक आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्ये महिलांचे मोठे योगदान आहे आणि हे योगदान अतुलनीय आहे . महिला सशक्तीकरण आणि मुला-मुलींमधील भेदभाव दूर करण्याच्या उद्देश साध्य झाल्यास खरा जागतिक महिला दिन साजरा होईल,  असे सांगितले.

    शितोळे म्हणाले की, ‘आपल्या घरापासून ते देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोठे असते. घरातील सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते न थकता, ना तक्रारी करता ती आपली जबाबदारी पार पाडत असते. अशा महिलांचा सन्मान करुन समाजातील दुसर्‍या महिला पुढे आदर्श निर्माण करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. कर्वे नगर भागातील युवतींना आणि महिलांना महिला दिनाच्या निमित्ताने असा सन्मान करता आले याबाबत समाधानी असल्याचेही संकेत शितोळे म्हणाले.