कोरोनाच्या काळात सामाजिक कार्य करणाऱ्या महिला मंडळाचा सन्मान

शिरूर : आदिशक्ती महिला मंडळाच्यावतीने राबवण्यात येणारे विविध समाजिक उपक्रम काैतुकास्पद असून या महिला मंडळाने समाजापुढे एक आदर्श ठेवला असल्याचे प्रतिपादन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी

शिरूर : आदिशक्ती महिला मंडळाच्यावतीने राबवण्यात येणारे विविध समाजिक उपक्रम काैतुकास्पद असून या महिला मंडळाने समाजापुढे एक आदर्श ठेवला असल्याचे प्रतिपादन शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणा-या शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना येथील आदिशक्ती महिला मंडळाच्यावतीने आमदार पवार यांच्या हस्ते कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानीत आले.यावेळी ते बोलत होते.कोरोना महामारीच्या लढाईत आव्हानात्मक  परिस्थितीत जिवाची पर्वा न करता नागरिकांची सुरक्षितता,अन्नदान,वैद्यकीय मदत,मार्गदर्शन  सामाजिक बांधिलकीतुन केलेल्या कार्याबद्दल येथील आदिशक्ती महिला मंडळाच्यावतीने शिरूर हवेलीचे आमदार अॅड.अशोक पवार,उपविभागिय अधिकारी संतोषकुमार देशमुख,तहसिलदार लैला शेख,सभागृहनेते प्रकाश धारीवाल,पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे,पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांसह पोलिस कर्मचारी,पत्रकार बांधव,डाॅक्टर्स,नगरपालिका कर्मचारी,नगरपालिका,तहसिलदार कार्यालय,जैन युवा व सामिजिक कार्यकर्ते आदिंचा शुक्रवार दि,२६ रोजी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आमदार अशोक पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

 यावेळी आदिशक्ती महिला मंडळाच्या संस्थापिका शशिकला काळे,अध्यक्षा सुनंदा लंघे,सचिव मनिषा कालेवार,सुवर्णा सोनवणे,लता नाझिरकर,संगिता शेवाळे,तज्ञिका कर्डीले राणी कर्डीले   यावेळी उपस्थित होत्या.