खाटा देण्यास टाळाटाळ हॉस्पिटल्सना भोवणार

करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी युद्ध पातळीवर तयारी पुणे : करोना रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व खासगी रुग्णालयांकडून बेडची संख्या,

करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी युद्ध पातळीवर तयारी

पुणे :
करोना रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व खासगी रुग्णालयांकडून बेडची संख्या, आयसीयू बेड आदींची माहिती मागविली आहे. या माहितीची प्रशासन पडताळणी करणार आहे. खोटी माहिती दिल्यास अथवा खाटा ताब्यात देण्यास टाळटाळ केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला.

खासगी हॉस्पिटलमधील खाटा ताब्यात घेण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. हॉस्पिटल्स कोविड केअर, कोविड हेल्थ केअर आणि कोविड हॉस्पिटल अशा ३ वर्गवारी करण्यात आल्या आहेत. कोविड केअरमध्ये खाटा, कोविड हेल्थ केअरमध्ये आयसीयूची सोय असते.

तर कोविड हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांवर उपचाराची सोय असते. प्रशासनाने सुमारे १८ हजार बेड तयार केले आहे. सध्या कोविड केअरमध्ये ८६७३ खाटा, कोविड हेल्थ केअरमध्ये१८५६ खाटा, कोविड हॉस्पिटलमध्ये (आयसीयूसाठी) ३५३ खाटा उपलब्ध आहेत.