आंबेगाव तालुका कोविड-१९ चे हॉटस्पॉट

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये दि. २९ रोजी पंधरा जणांची वाढ झाली आहे. कोरोना बाधीत आढळून आलेल्या व्यक्तिंच्या संपर्कात आलेले व नविन वाढ झालेले इतक्या मोठया प्रमाणात

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये दि. २९ रोजी पंधरा जणांची वाढ झाली आहे. कोरोना बाधीत आढळून आलेल्या व्यक्तिंच्या संपर्कात आलेले व नविन वाढ झालेले इतक्या मोठया प्रमाणात आढळून आल्याने तालुक्याची चिंता वाढली असून आता पहिले ९ व आत्ताचे नव्याने १५ असे एकंदरीत २४ कोरोना बाधित रूग्ण झाल्याने आंबेगाव तालुका हा कोव्हिड १९ चा हॉटस्पॉट झाला आहे.   

आंबेगाव तालुक्यामध्ये साकोरे, निरगुडसर, जवळे, पिंगळवाडी (लांडेवाडी), वडगाव काशिंबे, गिरवली, वळती आठ गावांमध्ये कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. या रूग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तिंचा रिपोर्ट व पेठ, एकलहरे, फदालेवाडी या गांवा व नविन व्यक्ति असे एकंदरीत १५ कोरोना बाधित व्यक्ति आढळून आल्या आहेत. यामध्ये वडगांव काशिंबे ७, शिनोली १, फदालेवाडी ३, घोडेगाव १, एकलहरे १, पेठ २ असे असुन यामध्ये ६ ते ४९ वयोगटातील १० महिला आहे. तर २७ ते ५५ वयोगटातील ५ पुरूष आहे, असे एकूण १५ जण कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.   

तालुक्यातील प्रत्येक गावात कोव्हीड १९ कमिटी आपले काम व्यवस्थित करत आहे. पोलीस प्रशासनही गावातील सर्व कमिटी यांना मदत करत आहे. मात्र मुंबईकरांनी तालुक्यावर आणलेले संकट आज अखरीस २५ कोरोना बाधित व्यक्तिंपैकी एक रूग्ण बरा झाले असल्यामुळे २४ कोरोना बाधित रूग्ण आहेत. संबंधित गावांना तहसिलदार रमा जोषी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी भेट देऊन गावांना जा-ये करणारे रस्ते बंद करण्यात आले आहे. तर नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले.