कोरोना नियमांचे उल्लंघन कराल तर हौसिंग सोसायट्यांना १० हजारांचा दंड भरावा लागेल!

सोसायटीच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्यात यावेत. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन करणाNया सोसायटीला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.

    पिंपरी। सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाचपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास ती हौसिंग सोसायटी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात येणार आहे. तसेच, त्या हौसिंग सोसायटीकडून नियमांचे पालन न झाल्यास दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

    कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांवर कटाक्षाने लक्ष ठेवण्यात येणार आहे. गृहनिर्माण सोसायटीत पाचपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यास ती सोसायटी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. या सोसायटीमध्ये तेथील रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध राहील. याबाबत सोसायटीच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्यात यावेत. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन करणाNया सोसायटीला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.

    तसेच, वारंवार उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावर देखरेखीसाठी पर्यवेक्षक नेमण्यात येईल.हौसिंग सोसायटीमध्ये येणाNया कामगारांचे, व्यक्तींचे लसीकरण करुन घ्यावे अन्यथा ‘आरटीपीसीआर’ चाचणी प्रमाणपत्र घ्यावे , असे महापालिकेने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.