शुटींगची परवानगी मिळालीच कशी? काम पूर्ण होण्याआधीच पुण्यातील मेट्रो स्टेशन मध्ये शाहरुख खानचे शूटिंग

तुकाराम नगर मेट्रो स्टेशनला खाजगी सुरक्षा रक्षक तसेच पोलिसांचा चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी तीन दिवस हे शुटींग होत आहे. या चित्रपटाचे नाव काय हे समजू शकलेले नाही. मात्र, मेट्रो ट्रॅकवरील एका स्टंटचा शॉट येथे शूट करण्यात आल्याचे समजते.

    पुणे : काम पूर्ण होण्याआधीच पुण्यातील मेट्रो स्टेशन मध्ये चित्रपटाचे शुटींग करण्यात आले. अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या आगामी चित्रपटाचे काही सीन पिंपरी-चिंचवड येथील तुकाराम नगर मेट्रो स्टेशन मध्ये शुट करण्यात आले आहेत.

    तुकाराम नगर मेट्रो स्टेशनला खाजगी सुरक्षा रक्षक तसेच पोलिसांचा चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी तीन दिवस हे शुटींग होत आहे. या चित्रपटाचे नाव काय हे समजू शकलेले नाही. मात्र, मेट्रो ट्रॅकवरील एका स्टंटचा शॉट येथे शूट करण्यात आल्याचे समजते.

    मेट्रोचे शंभर टक्के काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्या आधीच याठिकाणी शूटिंगचा घाट का घातला गेला आहे? काम पूर्ण झाले नसताना शुटींगची परवानगी मिळालीच कशी? असा प्रश्न स्थानिकांडून उपस्थित करण्यात येत आहे.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]