शिवसेनेचा वर्धापन दिन कशा पद्धतीने साजरा होणार?, अनिल परब म्हणाले की…

अनिल परब पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच त्यांनी कोरोना रोगाने संपूर्ण राज्यात जे थैमान घातलं आहे. ते पाहता वर्धापन दिन साधेपणाने करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. अनिल परब यांनी सांगितलेल्या माहितीवरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांसोबत संवाद साधणार असल्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे.

    पुणे : उद्या म्हणजेच 19 जून रोजी शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाबाबत सस्पेन्स आहे. त्यामुळे नेमका कशा पद्धतीने वर्धापन दिन साजरा केला जाणार?, याविषयी सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

    दरम्यान याचं पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी माहिती दिली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. अनिल परब पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच त्यांनी कोरोना रोगाने संपूर्ण राज्यात जे थैमान घातलं आहे. ते पाहता वर्धापन दिन साधेपणाने करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. अनिल परब यांनी सांगितलेल्या माहितीवरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांसोबत संवाद साधणार असल्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे.

    तसेच पुणे मेट्रोचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही अनिल परब यांनी दिली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राम मंदिराच्या मुद्दयावरून भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर राडा केला होता. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, त्यावर शिवसेना भवनासमोर जो राडा झाला. त्याचं उत्तर भाजपला दिलं जाईल, असा इशाराही अनिल परब यांनी भाजपला दिला आहे