आंबेगाव तालुक्यात चक्रीवादळाचा घरे,शेती व विदयुत विभागाला मोठा फटका

भिमाशंकर : निसर्ग चक्रिवादळामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील नागरिकांचे घरे, पोल्ट्री फॉर्म, अंगणवाडी, शाळा, कांदा बराखी, बैलांचा मांडव, शेळीपालन शेड, हॉटेल, विदयुत विभागाचे पोल, तारा

भिमाशंकर : निसर्ग चक्रिवादळामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील नागरिकांचे घरे, पोल्ट्री फॉर्म, अंगणवाडी, शाळा, कांदा बराखी, बैलांचा मांडव, शेळीपालन शेड, हॉटेल, विदयुत विभागाचे पोल, तारा आदिंचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, या नुकसानग्रस्त गावांची पाहणी गटविकास अधिकारी जालींदर पठारे, शिवसेना गटनेते देविदास दरेकर, जिल्हा परीषद सदस्य रूपाली जगदाळे यांनी केली. तर या भागातील विजपुरवठा सुरळीत करावा असे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सुचना केल्या

आंबेगाव तालुक्यातील ढाकाळे, कुरवंडी, भावडी, पेठ, आमांेडी, गाडेकरवाडी, गोहे खुर्द, पोखरी, निगडाळे, कांेढवळ, असाणे, उंबरवाडी, हरणमाळ इत्यादी बहुतेक गावांतील अंगणवाडी, शाळा, घरांवरील कौले, पत्रे चक्रीवादळाने उडाली तर काहींचे नुकसान झाले. तर काहींच्या भिंती पडल्या. यामुळे बहुतेक नागरिकांचे संसार उघडयावर आले आहे. जनावरांचे खादय भिजले. तसेच शेतक-यांची केळी, मका, कांदा आदि पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. यासर्वांचे महसुल विभागाचे मंडलाधिकारी, तलाठी व पंचायत समिती विभागाचे ग्रामसेवक चक्रिवादळाने नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांचे पंचनामे करीत होते. 

यावेळी गटनेते देविदास दरेकर यांनी सांगितले की, निसर्ग चक्रीवादळाने ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाणार असून नागरिकांनी तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून आपल्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत.