Video : लष्कर परिसरात म्हैस ‘आउट ऑफ कंट्रोल’; पती-पत्नी जखमी

लष्कर परिसरात म्हैस उधळून दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

    पुणे : लष्कर परिसरात म्हैस उधळून दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

    जुबेर अस्लम शेख (वय 38, रा. निलकंठ विहार) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शहनबाज अब्दुल रजाक कुरेशी, सदाकत कुरेशी आणी नदाफत कुरेशी ( सर्व रा.लष्कर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे तिघेही म्हशींचे मालक आहेत.

    पंधरा दिवसांपूर्वी (दि. 8) तक्रारदार जुबेर हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी समोरुन म्हशी येत होत्या. यामुळे त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला घेतली व म्हशी जाण्याची वाट पाहत थांबले. मात्र, अचानक म्हशीने उधळून त्यांना व त्यांच्या पत्नीस जोरात धडक दिली. यात दोघेही जखमी झाले. तर गाडीचे देखील नुकसान झाले आहे.

    दरम्यान म्हशींचे मालक व फिर्यादी यांच्यात नुकसान भरपाई देण्याची बोलणी सुरू होती. जुबेर यांचे बोट फ्रॅक्‍चर झाले होते. ते संगणक अभियंता असल्याने त्यांना बोटामुळे काम करणे शक्‍य नसल्याने त्यांनी म्हशींच्या मालकाकडे 1 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र, म्हैस मालक फक्त 5 हजार देण्यास तयार होता. त्यामुळे त्यांनी तक्रार केली. यानुसार गुन्हा दाखल केला असल्याचे लष्कर पोलिसांनी सांगितले आहे.