पती पत्नीच्या भांडणात दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून अंत; खाणीत उडी घेत आईने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

पहाटे येथील अतुल सूर्यवंशी आणि अंजली सूर्यवंशी (दोघे रा.पिंपळी, ता. बारामती) या पती पत्नी मध्ये भांडण झाले. त्यामुळे अंजली हिने रागाच्या भरात आत्महत्या करण्याचा निर्णय घेत पिंपळी येथील गावाबाहेर असलेल्या खाणीच्या दिशेने निघाली. खाणीच्या ठिकाणी पोहचल्यावर रागात विवाहितेने खाणीच्या पाण्यात उडी मारली.

    बारामती : पती-पत्नी मध्ये झालेल्या वादातून पत्नीने दगड खाणीत साठलेल्या पाण्यात उडी घेतली,मात्र आईला वाचवताना चार व‌ दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलांचा पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाल्यची ह्रदयद्रावक घटना पिंपळी (ता. बारामती ) येथे घडली. दरम्यान या घटनेत पत्नीला मात्र पतीने सुखरूप बाहेर काढले आहे.

    शनिवारी (दि.२९) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. पहाटे येथील अतुल सूर्यवंशी आणि अंजली सूर्यवंशी (दोघे रा.पिंपळी, ता. बारामती) या पती पत्नी मध्ये भांडण झाले. त्यामुळे अंजली हिने रागाच्या भरात आत्महत्या करण्याचा निर्णय घेत पिंपळी येथील गावाबाहेर असलेल्या खाणीच्या दिशेने निघाली. खाणीच्या ठिकाणी पोहचल्यावर रागात विवाहितेने खाणीच्या पाण्यात उडी मारली. मात्र याच वेळी आईला पाहण्यासाठी त्यांची दोन मुले दिव्या (वय ४) व शौर्य (वय २) हे दोघे पाठोपाठ पळत आले होते. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात ही दोन्ही मुले एका पाठोपाठ पाण्यात पडली.

    याच वेळी पती अतुल यांनी पत्नीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेऊन तिला पाण्याबाहेर काढले. पण या तणावात दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अतुल यांनी मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला,मात्र मुले लहान असल्याने त्यांना वाचविण्याची संधी मिळाली नाही. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेनंतर या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह घटनेनंतर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. या ह्रदयद्रावक घटनेने पिंपळी परीसरात शोककळा पसरली आहे.

    Husband and wife quarrel two sparks drown in water The mother had attempted suicide by jumping into the mine