मुलांवर का ओरडता असे विचारणाऱ्या पत्नीला पतीची मारहाण

फिर्यादी आणि आरोपी हे पतीपत्नी आहेत. आरोपी सखाराम कामावरुन घरी आल्यावर मुलांवर ओरडले. पत्नीने मुलांवर का ओरडता असे विचारले. त्यावरून आरोपी पतीने पत्नीला मारहाण केली. तसेच, चाकूने हाताच्या बोटावर वार करून जखमी केले. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहे

    पिंपरी: मुलांवर का ओरडता असे विचारणाऱ्या पत्नीला पतीने मारहाण केली तसेच, हातावर चाकू मारुन जखमी केले. गुरुवारी (दि. २२) पूर्णानगर, चिंचवड येथे हा प्रकार घडला.आरती सखाराम लवटे (वय ४२, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. २३) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सखाराम मंजुनाथ लवटे (रा. पूर्णानगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.