लॉकडाऊन काळात पत्नीच्या जाचाला पती कंटाळले; पुण्यात सर्वाधिक तक्रारी दाखल

वर्क फ्रॉम होममुळे पुरुषांना बायकांच्या छळाला सामोरं जावं लागत असल्याचे उघड झाले आहे. बायकोकडून नवऱ्याला मारहाण, मानसिक आणि शारिरिक छळाचे प्रकार वाढले आहेत. पुण्यातील जवळपास दीड हजार नवरोबांनी पोलिसांत बायकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

    पुणे.  लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम कल्चर अवलंबल्या गेले आणि  नवरा बायको २४ तास एकत्र वेळ घालवू लागले. याचा परिणाम म्हणजे नवरोबांची मोठी पंचाईत झाली. वर्क फ्रॉम होममुळे पुरुषांना बायकांच्या छळाला सामोरं जावं लागत असल्याचे उघड झाले आहे. बायकोकडून नवऱ्याला मारहाण, मानसिक आणि शारिरिक छळाचे प्रकार वाढले आहेत. पुण्यातील जवळपास दीड हजार नवरोबांनी पोलिसांत बायकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.   गेली जवळपास दीड वर्ष कोरोना ठाण मांडून बसलाय.

    तो जायचं काही नाव घेईना. त्याच्यात शासन वारंवार लॉकडाऊनचा निर्णय घेत आहेत. अशा काळात घरातून काम केल्यावाचून पर्याय नाही. देशाच्या विविध भागांत लोक वर्क फ्रॉम होम करतायत. पुण्यात तर मोठा औद्योगिक पट्टा आहे. हिंजवडीसारखं देशातलं मोठं आयटी पार्क आहे. त्यामुळे पुणे शहरात वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

    पुणे पोलिसांचा भरोसा कक्ष आहे. या कक्षात जवळपास दीड हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये बायका मानसिक, शारिरिक छळ करत असल्याचे त्यांच्या नवऱ्याचे म्हणणे आहे. टाळेबंदीच्या काळात जवळपास 3 हजारांहून अधिक तक्रारी दाखल आहेत. त्यातील जवळपास दीड हजार नवरोबांनी बायकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

    यामध्ये भरोसा सेलकडून 2 हजार 394 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. बाकीच्या तक्रारींसंदर्भात पोलिस काम करत आहेत. शिवाय सामोपचाराने वाद कसे मिटतील यासाठी देखील पुणे पोलिस प्रयत्नशील आहेत.