विवाहितेच्या हुंडाबळी प्रकरणी पती गजाआड

फिर्यादी यांची मयत मुलगी आणि आरोपी मनोरंजनकुमार ७ डिसेंबर २० रोजी बिहार येथे विवाह झाला. लग्नानंतर आरोपी पतीने पंधरा दिवसांनी पत्नीला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही. तू हुंडा म्हणून माहेरावरून मोटार सायकल घेऊन ये, असे म्हणाला. ती देत नाही म्हणून आरोपी तिला जेवायला देत नसत. त्यामुळे तिने राहत्या घरात ओढणीच्या साह्याने छताच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

    पिंपरी : लग्नात हुंडा दिला नाही, माहेरावरून मोटर सायकल घेऊन ये, अशी विवाहितेकडे मागणी केली. त्याला नकार दिल्याने विवाहितेचा छळ केला. त्यातून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सासरच्या विरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे १७ डिसेंबर २०२० ते २१ एप्रिल २१ या कालावधीत हा प्रकार घडला.

    प्रेम चंदेश्वर गिरी (वय ४२, रा. मठचिलावे, ता. दरियापूर, जि. सारंग, बिहार) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २६) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या १९ वर्षीय विवाहित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा पती मनोरंजनकुमार हरेन्द्र भारती (वय २१), सासू कांतीदेवी हरेंद्र भारती (वय ३८), सासरे हरेन्द्रं भुवनेश्वर भारती (वय ४८, सर्व रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी पती मनोरंजनकुमार भारती याला पोलिसांनी अटक केली आहे.