चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

कर्जत : कर्जत तालुक्यातील चखालेवाडी येथील आरती सुरेश खटके वय ३५ हिचा पती सुरेश खटके याने जिवे मारल्याची फिर्याद बलभीम शंकर मिंड यांनी दिली.

 कर्जत  : कर्जत तालुक्यातील चखालेवाडी येथील आरती सुरेश खटके वय ३५ हिचा पती सुरेश खटके याने जिवे मारल्याची फिर्याद बलभीम शंकर मिंड यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, पती सुरेश याने पत्नी आरती सुरेश खटके हिच्या चारित्र्याच्या संशयावरून खुन केला आहे. हि घटना शुक्रवार (१२)रोजी दुपारी ३.२० वाजता घडली. 

आरोपी सुरेश खटके याने पत्नी विहिरीत पडल्याचा बनाव केला होता. पंरतु पोलीस व गावकरी हे जमा होण्या अगोदरच प्रत्येक विहिरीच्या वर काढून ठेवले होते. नंतर त्याने मोठमोठ्या ने पत्नी विहिरीत पडल्याची आरोळी ठोकली पण हि घटना पोलीसांना फोनवरून कळविण्यात आली होती.  त्यानुसार पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रेत कर्जत येथील उपजिल्हा रूग्णालयात आणून उच्चस्तरिय तपासणी केली व  प्रेत घरच्या च्या ताब्यात दिले मयातावर चखालेवाडी येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. तर पोलिसांनी काल आकस्मित मृत्यू ची नोंद केली होती पण नातेवाईकांनी आज फिर्याद दिल्याने पोलिसांनी आरोपी पती सुरेश याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे करत आहेत.