ajit pawar

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पुणे. ‘राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांचं दुखणंनेमकं काय आहे, हे मला चांगलं माहीत आहे’ असं म्हणत भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे.  तर दुसरीकडे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

‘कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी गाजरं द्यावी लागतात, भाजप नेत्यांकडून काड्या पेटवण्याचे काम केले जात आहे’,  असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. याबद्दल फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘अजित पवार यांचं नेमकं दुखणं काय आहे,  हे मला चांगलं माहीत आहे.  त्यामुळे त्यांच्या टीकेवर बोलणार नाही.’