सांगा आता काय करायचं? किराणा दुकानातील आईस्क्रीम, श्रीखंडही चोरीला

विवेक दशरथ मुंगसे (वय २७, रा. हनुमानवाडी, केळगाव) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे हनुमानवाडी केळगाव येथे ज्ञानाई सुपर मार्केट नावाचे किराणा दुकान आहे.

    पिंपरी : चोरटे काय चोरून नेतील याचा आता काही नेम नाही. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांकडून किराणा दुकान टार्गेट केले जात आहे. हनुमानवाडी केळगाव येथे एका किराणा मालाच्या दुकानात चोरी करून चोरट्यांनी गव्हाच्या गोण्यासह श्रीखंड आणि आईस्क्रीम चोरून नेले आहे. ही घटना रविवारी (दि. २५) सकाळी उघडकीस आली.

    विवेक दशरथ मुंगसे (वय २७, रा. हनुमानवाडी, केळगाव) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे हनुमानवाडी केळगाव येथे ज्ञानाई सुपर मार्केट नावाचे किराणा दुकान आहे. शनिवारी रात्री अकरा ते रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडले. दुकानातून तीस किलो वजनाच्या गव्हाच्या १२ गोण्या तसेच प्रâीजमध्ये ठेवलेले आईस्क्रीम आणि श्रीखंड असा एकूण १२ हजार ७९८ रुपये किमतीचा माल चोरून नेला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.