The Agriculture Act passed by the Center will not be repealed; Chandrakant Patil's direct reply to Sharad Pawar

'मराठा आरक्षणावर जाहीर वादविवाद करण्याची माझी तयारी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मी वाचला आहे. पानापानावर चुका दिसत आहेत, निष्काळजीपणा दिसतो आहे. तेच ओबीसींच्या बाबतीत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने वटहुकूम काढून ओबीसींचे राजकीय आरक्षण तात्पुरते टिकवले होते. त्यानंतर आमचे सरकार गेले. आता वटहुकूमचा कायदा करून ते टिकवायला हवे होते. ते केले नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आग्रह मागास आयोगाचा आहे. तो स्थापन झाला नाही.

    पुणे  :  महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार सगळ्यांचे गॉडफादर आहेत. वैचारिक मार्गदर्शक आहेत. स्वत:च्या पक्षासह महाविकास आघाडीतील पक्षावरही त्यांचा वचक आहे. त्यामुळे निर्णयाच्या पातळीवर काही होत असेल तर नेते म्हणून दोष त्यांच्याकडेही जातो,’ असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी राज्यातील सरकारच्या अपयशाला अप्रत्यक्षपणे पवारच जबाबदार असल्याचे संकेत दिले आहेत. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

    पडळकरांच्या भुमिकेत तथ्य
    पाटील म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाला शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळाले नाही. या सरकारला कुणाला आरक्षण द्यायचेच नाही,’ असा आरोप भाजपचे आमदार पडळकर यांनी केला आहे. त्याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की ‘गोपीचंद पडळकर हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी काही भूमिका मांडली आहे. त्यात तथ्य देखील आहे,

    निकालाच्या पानांवर निष्काळजीपणा दिसतो‘मराठा आरक्षणावर जाहीर वादविवाद करण्याची माझी तयारी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मी वाचला आहे. पानापानावर चुका दिसत आहेत, निष्काळजीपणा दिसतो आहे. तेच ओबीसींच्या बाबतीत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने वटहुकूम काढून ओबीसींचे राजकीय आरक्षण तात्पुरते टिकवले होते. त्यानंतर आमचे सरकार गेले. आता वटहुकूमचा कायदा करून ते टिकवायला हवे होते. ते केले नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आग्रह मागास आयोगाचा आहे. तो स्थापन झाला नाही.
    पाटील म्हणाले की, राजकीय आरक्षण का, यामागचा तर्क सर्वोच्च न्यायालयाला हवा आहे, तो दिला जात नाही,’ असा आरोपही पाटील यांनी केला.