पोलीस पाटलांना मारहाण कराल तर भोगावा लागेल ‘इतक्या’ वर्षांचा तुरुंगवास

इमाने इतबारे काम करताना पोलीस पाटलांना धमक्या आणि मारहाण होते. पोलीस पाटलांना झालेली मारहाण अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदविली जात होती. राज्य पोलीस पाटील संघटनेने पोलीस पाटलांना सरकारी कर्मचाऱ्यांसारखे संरक्षण देण्याची मागणी लावून धरली होती. नुकतीच मुंबईत बैठक झाली. या बैठकीत पोलीस पाटलांना मारहाण झाल्यास आरोपीविरुध्द आयपीसी ३५३ कलमानुसार गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला.

    पिंपरी: राज्य शासनाचा गावातील शेवटचा अधिकारी म्हणून पोलीस पाटील यांच्याकडे पाहिले जाते. या पोलीस पाटलांवर हात उचलणे आता चांगलेच महागात पडू शकते. गृह विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार पोलीस पाटलांना मारहाण करणे, त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यावर आयपीसी कलम ३५३ नुसार गुन्हा नोंदविण्याचे निर्देश जारी केले आहेत.

    प्रशासन आणि गावकऱ्यांमधील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करीत असतो. गावातील गुन्हेगाराची माहिती पोलिसांना कळविणे पोलीस पाटलांची जबाबदारी असते. इमाने इतबारे काम करताना पोलीस पाटलांना धमक्या आणि मारहाण होते. पोलीस पाटलांना झालेली मारहाण अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंदविली जात होती. राज्य पोलीस पाटील संघटनेने पोलीस पाटलांना सरकारी कर्मचाऱ्यांसारखे संरक्षण देण्याची मागणी लावून धरली होती. नुकतीच याविषयी   मुंबईत बैठक झाली. या बैठकीत पोलीस पाटलांना मारहाण झाल्यास आरोपीविरुध्द आयपीसी ३५३ कलमानुसार गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला.

    या बैठकीला गृहराज्यमंत्री शहरे, मुख्य सचिव गृह सीताराम कुटे, माजी जि. प. अध्यक्षा सुरेखा ठाकरे, पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीतील निर्णयानुसार ३ मार्च रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून, पोलीस पाटलांना मारहाण झाल्यास आरोपीविरुध्द आयपीसी कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करावा, असे निर्देश दिले आहेत.