बेकायदा वाळूउपसा, ९ जणांवर गुन्हा ; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त, यवत पोलिसांची कारवाई

पोलिसांनी एक जेसीबी मशीन, तीन वाळू वाहतुक करणारे ट्रक व त्यामधील अंदाजे साडेबारा ब्रास वाळू पत्येकी ८ हजार रूपये प्रमाणे १ लाख रूपयांची वाळू, असा एकुण ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्वाजनिक ओढयाचे व पर्यावरणाचे नुकसान करून वाळू चोरी केल्या प्रकरणी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई विजय आवाळे यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने नऊ जणांवर पर्यावरण संरक्षण कायदा आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अशी माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली.

    पाटस : दौंड तालुक्यातील केडगाव येथील मुळा मुठा बेबी कालव्याजवळील सार्वजनिक ओढ्यात रात्रीच्या सुमारास जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाळूउपसा करून ती पुणे येथील ट्रक चालकाला चोरून विक्री केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी नऊ वाळू चोरांवर गुन्हा दाखल केला आहे. वाळूचे ट्रक, जेसीबी मशीन, वाळू असा एकूण ३० लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे,अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.

    – बेकायदा वाळू उपसा सुरू
    अमोल चैधरी रा.नायगांव (ता.हवेली) जि.पुणे, राजेंद्र गायकवाड (रा. हडपसर पुणे ), निखील माणिक मगर (रा. नायगांव (ता.हवेली) जि.पुणे, अजिंक्य भाउसाहेब शेळके, अषिष शेळके (दोन्ही रा.शेळकेवस्ती केडगांव (ता.दौंड) जि.पुणे, इतर तीन ट्रक चालक व एक जेसीबी मशीन चालक असे गुन्हा दाखल केलेल्या वाळू चोरांची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती अशी की, सोमवारी (दि.५ )रात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील मुळा मुठा बेबी कालव्या जवळील सार्वजनीक ओढयात जेसीबी मशीनच्या साह्याने बेकायदा वाळू उपसा सुरू असल्याची माहिती यवत पोलीसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी तत्काळ पोलीस कर्मचारांचे पथक सदर ठिकाणी छापा टाकण्यासाठी तैनात केले. या पथकाने माहिती मिळाल्या ठिकाणी छापा टाकला असता सार्वजनिक ओढ्यात जेसीबी मशीनच्या सह्याने वाळू उपसा सुरू होता. याठिकाणी वाळू साठा करून तो ट्रक मध्ये भरून चोरी करण्यासाठी ट्रक आल्याचे निदर्शानास आले. मात्र पोलीस आल्याची चाहुल लागताच ट्रक चालक, जेसीबी चालक हे ट्रक आणि जेसीबी मशीन जागीच ठेवून अंधाराचा फायदा घेवून पसार झाले.

    -पर्यावरणाचे नुकसान