आरोपी इम्रान पिंजारी याला ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक.
आरोपी इम्रान पिंजारी याला ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक.

बारामती : गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीस विनापरवाना गावठी पिस्तुलसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात आली. इम्रान बूरहान पिंजारी( वय २३ वर्षे, रा आव्हाळ वाडी रोड वाघोली ता हवेली, मूळ रा देगलूर नाका नांदेड)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

यवत पोलिस स्टेशन हद्दीत फरारी आरोपी चा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती वरून यवत येथे भुलेशवर फाटा , यवत( ता दौड) येथे एक इसम काळे रंगाची, त्यावर लाल पट्टे असलेली एक मोटार सायकल घेऊन वारंवार फिरत असल्याचे समजले. तसेच त्याच्याकडे गावठी पिस्तुल असल्याचे देखील कळाले. यावरून सदर ठिकाणी पथकाने सापळा रचून संशयित फिरणाऱ्या इसमास त्याच्या गाडीसह ताब्यात घेतले सदर इसमाची अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी बनावटीचे पिस्तुल असल्याचे समजले. सदर इसमास नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव इम्रान बूरहान पिंजारी असे सांगितले.पिंजारी यास त्याच्या गाडीसह ताब्यात घेऊन यवत पोलिस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) मु पो का क १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पिंजारी याच्याकडून ४० हजार रुपये किंमतीचे लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल,२० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकुण ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पोलिस हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, काशीनाथ राजपुरे, विजय कांचन, पोलिस नाईक अभिजित एकशिंगे, धिरज जाधव, यवत पोलिस ठाण्याचे जगताप, तानाजी साबळे, कॉ किरण तुपे, विजय आव्हाळे यांनी केली आहे.