कोरोना बाधित रुग्णांना तातडीने मदत; महापालिका आणि बीवीजी देणार मोफत रुग्णवाहिका सुविधा

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने तीन संपर्क क्रमांक दिले आहेत. त्यावर संपर्क केल्यास तत्काळ मोफत रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका व बीव्हीजी एमईएमएस (Maharashtra Emergency Medical Services) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा पुरविण्यात येणार आहे.

    पिंपरी :  पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने तीन संपर्क क्रमांक दिले आहेत. त्यावर संपर्क केल्यास तत्काळ मोफत रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका व बीव्हीजी एमईएमएस (Maharashtra Emergency Medical Services) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा पुरविण्यात येणार आहे.

    यापूर्वी सगळ्यांना ज्ञात असलेला 108 क्रमांक आणि महापालिकेच्या 020-67331154/020-67332101 या क्रमांकावर फोन केल्यास तातडीने रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचणे सोयीस्कर होणार आहे. याबाबतची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे. ही हेल्पलाईन 24X7 उपलब्ध असणार आहे. ही संपूर्ण सेवा निःशुल्क असणार आहे.

    त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिकेने यापूर्वीच कोरोना आजाराने मृत पावलेल्या रुग्णांसाठी स्मशानभूमीतील प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी 020-67331155 ही हेल्पलाईन सुरु केलेली आहे. जेणेकरून कोणत्या जवळच्या स्मशानभूमीमध्ये कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णास नेऊन तिथे अंतिम संस्कार करता येतील व प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी ही सेवा 24×7 तास सुरु राहणार असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले.