बारामतीत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी

शहराच्या बाहेरील मुख्य रस्त्यांवर ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी दिनांक ४ मे रोजी बारामती शहरातून पोलीस दलाच्या ‌वाहनांची रॅली काढून संचलन करण्यात आले. विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांवर थेट कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी सांगितले.

    बारामती : बारामती शहर व तालुक्यात कोरोना ‌बाधितांची संख्या कमी होत नसल्याने बुधवारी (दि ५) मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे.या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी बारामती शहरात काटेकोरपणे सुरू आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे.

    रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाची चौकशी पोलीस करत आहेत.

    बारामती शहरात कोरोना बाधित यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर दि ५ एप्रिल पासून बारामती शहर व तालुक्यामध्ये लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. मात्र सकाळी सात ते ११ या वेळेत बेकरी, किराणा, भाजीपाला व्यवसाय सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होत नव्हती. कोरोना बाधितांची संख्याही कमी होत नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत कडक लॉकडाऊन करण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेण्याची सूचना केली होती. त्यामुळे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दुसऱ्याच दिवशी प्रशासकीय अधिकारी व व्यापारी यांची बैठक घेतली. या बैठकीत दिनांक ५ मे पासून बारामतीत सात दिवसांचे कडक लॉकडाऊन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णयाची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आले आहे. या निर्णयानुसार दवाखाने, मेडिकल वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दूध विक्री सकाळी सात ते नऊ या वेळेतच ठेवण्यात आली आहे. बारामती शहरात स्त्यावरून फिरणार्‍या प्रत्येक वाहनचालकांना ‌अडवून त्याची चौकशी केली जात आहे.पास अथवा दवाखान्याची कागदपत्रे नसणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षी प्रमाणे रस्ते व बाजारपेठा ओस पडल्या आहेत. शहराच्या बाहेरील मुख्य रस्त्यांवर ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी दिनांक ४ मे रोजी बारामती शहरातून पोलीस दलाच्या ‌वाहनांची रॅली काढून संचलन करण्यात आले. विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांवर थेट कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी सांगितले.