कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुक व नऱ्हे येथील नोकरदारांसाठी सहा जूनपासून  महत्वाचा निर्णय

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुक व नऱ्हे या चार गावांमधील शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा खासगी कंपनीत काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना यांना सहा जून पासून पुढील

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुक व नऱ्हे या चार गावांमधील शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा खासगी कंपनीत काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना यांना सहा जून पासून पुढील सात दिवस आपआपली कामे एकतर घरी बसून, अथवा कामाच्या ठिकाणी राहूनच करावी लागणार आहेत. कारण, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी शासकीय व खासगी कंपनीत काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत ये-जा करण्यास बंदी घातली आहे. 

हवेली तालुक्यात कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुक व नऱ्हे या चार मोठ्या ग्रामपंचायत हद्दीत मागिल दोन महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळुन आले होते. येथील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबवयाच्या उपाययोजनांबाबत विचारविनिमय करण्यासाठी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दोन दिवसांपूर्वी या चार गावांतील आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत उपस्थित असलेल्या बहुसंख्य अधिकाऱ्यांनी या चार गावात कोरोना वाढीस या गावातील शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांची पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रोजची ये-जा मोठ्या प्रमाणात काऱणीभूत असल्याची भिती उपस्थित केली होती. त्यामुळे बारवकर यांनी वरील आदेश काढला आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना बारवकर म्हणाले की, कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुक व नऱ्हे या चार गावात रहिवासी असलेले अनेक शासकीय व खासगी व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचारी आपआपल्या कामासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत रोजच ये-जा करतात. दुसरीकडे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले अनेक शासकीय व खासगी व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचारी आपआपल्या कामासाठी या चार गावात आपआपल्या 

कामासाठी प्रवास करतात

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अथवा शहरातून ग्रामपंचायत हद्दीत ये-जा करणाऱ्यांकडून या चार ग्रामपंचायत हद्दीत पुन्हा कोरोनाचा मोठ्या प्रमानात प्रादुर्भाव होण्याची भिती आहे. त्यामुळेच सहा जुनपासून तब्बल सात दिवस (शनिवारी (ता. ६) पहाटे पाच वाजलेपासुन शुक्रवारी (ता. १२) रात्री बारा वाजेपर्यत) या चार गावातून पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत अथवा पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून वरील चार गावात शासकीय असो वा खाजगी कर्मचारी अशा सर्वांनाच बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लघंन करण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे बारवकर यांनी सांगितले.