बारामतीत त्या मित्र परिवाराकडून चारशे रुग्णांना दररोज जेवणाची सोय ; आमदार रोहित पवार यांनी ‌केले उपक्रमाचे कौतुक

बारामती शहरात अद्ययावत उत्तम सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याने बारामती शहराच्या ग्रामीण भागातून व इतर तालुक्यातून बारामती शहरांतील दवाखान्यांमध्ये रुग्ण संख्येत वाढ होत आहे. याच कालखंडात कडकडीत लॉकडाऊन असल्याने रुग्णांची जेवणाची गैरसोय होत आहे हे लक्षात आले. बारामती शहरातील देसाई इस्टेट मधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बारामती शहर कार्याध्यक्ष विशाल पोपटराव जाधव व मित्र परिवारातील तरुण युवक तसेच प्रवीण बोरा, त्यांच्या पत्नी सपना बोरा, आई सुशीला बोरा ,भाऊ महावीर बोरा, त्यांची पत्नी यांनी रुग्णांना मोफत जेवण पुरविण्याचे ठरविले. रोज २५० ते ४०० रुग्णांना तसेच ज्या नातेवाईकांची जेवणाची गैरसोय आहे, अशा नातेवाईकांना ते विनामूल्य जेवण पुरवत आहेत.

    बारामती : शहरातील अडीचशे ते चारशे रुग्ण, त्यांचे नातेवाईक व निराधार व्यक्तींना देसाई इस्टेट मधील तरुणांनी दररोज जेवणाची सोय केली आहे.विशाल जाधव ‌व प्रविण बोरा यांचे कुटुंबीय व त्यांचा मित्र परिवार जेवण बनविण्यापासून ते पोहोच करण्यापर्यंत झटत आहेत.कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी स्वतः बारामतीत येऊन या उपक्रमाची पाहणी करून या युवकांचे कौतुक केले. निराधारांना जेवण देणे म्हणजे खऱ्या अर्थाने पुण्याचे काम असल्याचे आ. पवार यांनी सांगितले.

    बारामती शहरात अद्ययावत उत्तम सोयीसुविधा उपलब्ध होत असल्याने बारामती शहराच्या ग्रामीण भागातून व इतर तालुक्यातून बारामती शहरांतील दवाखान्यांमध्ये रुग्ण संख्येत वाढ होत आहे. याच कालखंडात कडकडीत लॉकडाऊन असल्याने रुग्णांची जेवणाची गैरसोय होत आहे हे लक्षात आले. बारामती शहरातील देसाई इस्टेट मधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बारामती शहर कार्याध्यक्ष विशाल पोपटराव जाधव व मित्र परिवारातील तरुण युवक तसेच प्रवीण बोरा, त्यांच्या पत्नी सपना बोरा, आई सुशीला बोरा ,भाऊ महावीर बोरा, त्यांची पत्नी यांनी रुग्णांना मोफत जेवण पुरविण्याचे ठरविले. रोज २५० ते ४०० रुग्णांना तसेच ज्या नातेवाईकांची जेवणाची गैरसोय आहे, अशा नातेवाईकांना ते विनामूल्य जेवण पुरवत आहेत. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते लोकांना जेवण देण्यात आले. प्रवीण बोरा यांच्या मातोश्री सुशीला बोरा यांचे वय ८० वर्षे असून सुद्धा त्या सकाळी लवकर उठून जेवण बनविण्यात मदत करतात. सोबत भावना बोरा, सपना बोरा या सुध्दा जेवण बनवताना खुप कष्ट घेत आहेत. मानवतावादी दृष्टिकोनातून देसाई इस्टेट मधील या बोरा कुटुंबीय व तरुण युवकांकडून हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमासाठी अनेक दानशूर व्यक्ती समोर येऊन मदत करत आहेत.

    यामध्ये बोरा कुटूबिय व मित्रपरिवारातील सचिन मोरे मंगेश गिरमे,दत्तात्रय जाधव सागर मोहिते, हर्ष बोरा, सुरेश झगडे सत्यजित काटकर,मंगेश खांडेकर,कुंदन आवळे,शाम शेवाळे, ओंकार लाळगे निशांत शेंडगे,देवेश बोरा,स्वप्निल दिवटे, हिमांशू गालिंदे,नेहाल दमोदरे राहुल वर्मा इत्यादी सर्व यासाठी कष्ट घेत आहेत.