बारामतीतही लहान मुलांच्या लसीकरणाच्या चाचण्या होणार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक संसर्ग लहान मुलांना होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर १२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाबाबत सध्या देशात चाचण्या सुरु असून बारामतीतील बारामती हॉस्पिटलमध्येही १०० ते १५० मुलांवर या चाचण्या केल्या जाणार आहेत. या चाचण्या मध्ये २८ दिवसांच्या कालमर्यादेत या मुलांना तीन डोस देऊन त्यांच्यामध्ये काय परिणाम होतात याचा अभ्यास केला जाणार आहे.

    बारामती :  किशोरवयीन मुलांसाठी लसीकरणाच्या चाचण्या बारामतीतही होणार असून या चाचण्या नंतर या मुलांना लसीकरणाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक संसर्ग लहान मुलांना होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर १२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाबाबत सध्या देशात चाचण्या सुरु असून बारामतीतील बारामती हॉस्पिटलमध्येही १०० ते १५० मुलांवर या चाचण्या केल्या जाणार आहेत. या चाचण्या मध्ये २८ दिवसांच्या कालमर्यादेत या मुलांना तीन डोस देऊन त्यांच्यामध्ये काय परिणाम होतात याचा अभ्यास केला जाणार आहे.

    लसीकरण करण्यापूर्वी या मुलांच्या आरटीपीसीआर तपासणी तसेच त्यांच्यातील अँटी बॉडीजच्या तपासण्याही केल्या जाणार आहेत. बारामतीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. भास्कर जेधे हे या प्रक्रीयेमध्ये प्रिन्सिपल इनव्हेस्टीगेटर म्हणून कार्यरत असतील.

    एका कंपनीच्या लसीची ही चाचणी होणार असून मुलांमध्ये लस देण्यापूर्वी व नंतरचे बदल यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. भारतात अजूनही लहान मुलांसाठी कोणत्याच कंपनीच्या लसीला संपूर्ण मान्यता मिळालेली नाही, या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांकडून लसीच्या चाचण्या वेगाने सुरु आहेत. बारामतीत तिस-या टप्प्यातील लसीची चाचणी केली जाणार आहे. बारामतीतही लहान मुलांच्या लसीकरणाच्या चाचण्या होणार ही बाब बारामतीच्या दृष्टीने महत्वाची आहे.