दौंड तालुक्यात जलपर्णीमुळे भीमा नदीचे पात्र दूषित ; जलचरप्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर

भीमा नदी लगतच्या गावांमध्ये ठिकठिकाणी कोल्हापुर पध्दतीचे बांधारे बांधण्यात आले आहेत. त्याठिकाणी या जलपर्णीची मोठ्या प्रमाणावर पसरल्या आहेत. जलपर्णीमुळे नदी पात्राचे नैसर्गिक स्वरूप बदलत चालले आहे. पर्यावरणास या जलपर्णी घातक ठरू लागल्या आहेत.

    पाटस: दौंड तालुक्यात भीमा नदी पात्रात जलपर्णी ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या जलप्रर्णीमुळे नदी पात्रातील पाणी हे दूषित झाले असून जलचर प्राण्यांचा श्वास गुदमुरतोय, मासे व तर जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी आसपासच्या गावातील कुटूंबाचा उदारनिर्वाह असणारा छोठेमोठे मस्त्य व्यवसायीकांचा व्यवसाय हा धोक्यात आला आहे.

    -जलपर्णी काढण्याची मोहीम राबवण्याची आवश्यकता
    दौंड तालुक्यातील कानगाव, हातवळण, नानगाव, गार आदी भागातील भीमा नदी पात्रात हिरवीगार जलपर्णी नावाची जलवनस्पती सध्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या जलवनस्पती पाण्यात पसरू लागल्याने नदीचे पात्र हिरवेगार झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. या जलपर्णीमुळे नदीपात्रातील हजारे मासे व इतर जलचर प्राणी मोठ्या प्रमाणावर दगावले आहेत. नदीपात्रातील जलप्राण्यांचे अतिस्तव संपुष्टात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा मोठा फटका याभागातील छोट्या मासे व्यवसायिकांना फटका बसत आहे. काही ठिकाणी या जलप्रर्णीमुळे वाळून गेल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गुंधी पसरली आहे. पाळीव प्राणी व शेतपिकांच्या पाण्यावर ही विपरीत परिणाम होत आहे. नदी पात्रातील या दुषीत पाण्याच्या मोठा फटका नदीकाठच्या गावांना बसत आहे.

    -शेतपिकांच्या पाण्यावर ही विपरीत परिणाम
    भीमा नदी लगतच्या गावांमध्ये ठिकठिकाणी कोल्हापुर पध्दतीचे बांधारे बांधण्यात आले आहेत. त्याठिकाणी या जलपर्णीची मोठ्या प्रमाणावर पसरल्या आहेत. जलपर्णीमुळे नदी पात्राचे नैसर्गिक स्वरूप बदलत चालले आहे. पर्यावरणास या जलपर्णी घातक ठरू लागल्या आहेत. संबंधित विभाग व पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक संघटनांनी नदीपात्रातील या जलपर्णी काढण्याची मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे. नदी पात्रात जलपर्णी सारखी वनस्पती हद्दपार करण्याची आवश्यकता आहे. भविष्यात भीमा नदी पात्रात होणारी वाढ ही या जलप्रणी वनस्पती नदीकाठालगतच्या गावांना धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.