मंचर : मंचर (ता.आंबेगाव) येथील महिला कोरोना योध्यांचा आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मर्दानी महाराष्ट्राची हा पुरस्कार देऊन बुधवारी सायंकाळी मंचर उपजिल्हा रुग्णालयात सन्मान

मंचर : मंचर (ता.आंबेगाव) येथील महिला कोरोना योध्यांचा आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मर्दानी महाराष्ट्राची हा पुरस्कार देऊन बुधवारी सायंकाळी मंचर उपजिल्हा रुग्णालयात सन्मान करण्यात आला.

महिला कोरोना योध्यांचा आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्ध्या म्हणून काम करणाऱ्या मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.चंदाराणी पाटील यांना उत्तम प्रशासकीय सेवेसाठी, तर मंचर येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.वर्षाराणी गाडे यांचा उत्तम वैद्यकीय सेवेसाठी, महिला पोलीस  वैशाली कोणेकर यांना कायदा व सुव्यस्था राखण्याच्या कामातील योगदानासाठी, अंगणवाडी सेविका सुरेखा दैने व आशा वर्कर सुजाता मोरडे यांना उत्तम वैद्यकीय सहाय्याच्या कामासाठी, तर ग्रामपंचायत सदस्या माणिक गावडे यांना सामाजिक कामासाठी मर्दानी महाराष्ट्राची हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुषमा शिंदे,जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात,महिला राष्ट्रवादीच्या मंचर शहराध्यक्षा वेणू खरमाळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.