आता कुठलीही कुबडी नको; महाराष्ट्रात भाजपाने घेतला मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक अडचणींचा सामना करणारे महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळेल, असे दावे सध्या राजकीय वर्तुळात केले जात आहे. आगामी काळात भाजपा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात सरकार स्थापन करेल, अशा चर्चाही रंगल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात भाजपला आता कुठलीही कुबडी नको. 2024 मध्ये भाजप महाराष्ट्रात स्वबळावर लढेल आणि सत्ता आणेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

    पुणे : गेल्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक अडचणींचा सामना करणारे महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळेल, असे दावे सध्या राजकीय वर्तुळात केले जात आहे. आगामी काळात भाजपा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात सरकार स्थापन करेल, अशा चर्चाही रंगल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात भाजपला आता कुठलीही कुबडी नको. 2024 मध्ये भाजप महाराष्ट्रात स्वबळावर लढेल आणि सत्ता आणेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

    भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशात गेल्यावेळी भाजपाचे 303 खासदार निवडून आले होते. पुढच्या वेळेस 400 खासदार निवडून येतील. अनेक राज्यांत स्वतःच्या ताकदीवर भाजपचे उमेदवार निवडून येत आहेत.

    फक्त महाराष्ट्रात आम्हाला अडचण होती. ती सुद्धा येत्या निवडणुकीत संपवणार, असे पाटील म्हणाले. भारतीय जनता पक्ष येथून पुढे महाराष्ट्रातील सर्व निवडणुका स्वबळावर लढेल. आता कुठलीही कुबडी नको. भारतीय जनता पक्ष आता स्वबळावर 2024 मध्ये महाराष्ट्रात सत्ता आणेल, असे पाटील यावेळी म्हणाले.