नारायणगावात सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्तुलासह अटक

नारायणगाव : नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने एका सराईत गुंडाला बेकायदेशीर गावठी पिस्तुलासह सापळा रचून काल दि ३ जून ला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात

नारायणगाव :  नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने एका सराईत गुंडाला बेकायदेशीर गावठी पिस्तुलासह सापळा रचून काल दि ३ जून ला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती एटीएस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिली.रोहिदास बाबुराव पाबळे वय ३७ वर्षे, रा कावळ पिंपरी  तालुका जुन्नर याच्यावर आर्मऍक्ट नुसार नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . 

याबाबत पोलिस अधिकारी मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार काल दि 3 जून दुपारी तीनच्या सुमारास जुन्नर तालुक्यात चक्रीवादळ सुरू असताना एटीएस पथक नारायणगाव परिसरात गस्त करीत असताना  दहशतवाद विरोधी कक्षाचे  ए एस आय राजू पवार व किरण कुसाळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नारायणगाव पोलिसांच्या मदतीने  रोहिदास  पाबळे याला कावळ पिंपरी येथून सापळा रचून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल ,एक जिवंत काडतुस हस्तगत  त्याचेवर बेकायदेशीर बिगरपरवाना शस्त्र बाळगले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        या आरोपीवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.ही

 कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी  दीपाली खन्ना ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू पवार, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, मोसिन शेख, नारायणगावचे पोलीस कर्मचारी योगेश गारगोटे, सचिन कोबल या पथकाने संयुक्तिक कारवाई केली आहे.